एका स्फुटलेखाचा वानवळा
डॉट to डॉट विथ रोटी (भाग - 9)
रोटी किंवा पोळी म्हंटल कि मला माझं लहानपण आठवत. मी तेव्हा ७ वित किंवा ८ वित असेन बहुधा. माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई तिला आम्ही वाहिनी आज्जी म्हणायचो. आज्जीला खूप बरं नव्हतं, म्हणून आईला भुसावळ ला जावं लागणार होत. मग घरी मी, ताई, निवेदिता आणि आमची आजी (बाबांची आई) आम्हीच होतो. ताई पहिल्यापासून स्वयंपाकात हुश्शार, त्यामुळे मदत करतांना माझ्याकडे आपोआपच पोळी बनवायचं काम आलं. मी माझी पहिली पोळी तेव्हा केली, जेव्हा मी चौथीत होते. मी पहिल्या पासूनच गोल गोल पोळ्या बनवायचे. ताईने भाजी बनवायची मी पोळ्या करायचे. पण ताई पोळ्या, पराठे, धिरडी, थालीपीठ सगळंच करायची, मी मात्र पोळ्याच करत होते. may be सोपं वाटत असावं मला. किंवा त्यासाठी मिळणारी प्रशंसा असावी.
आई पोळ्या करतांना पटापट मोठ्या मोठ्या करायची, आणि तिला खेळत राहायला आवडायचं नाही. ती मध्ये घडी घालूनच पोळी करायची पण वाहिनी आजी चिमटीची पोळी करायची. आणि अर्थातच दोघींच्या मऊ छान असायच्या.
बाबा नागपुरी स्टाईल चौकोनी पराठा करायचे. खूप मस्त असायचा तो. तर बाबांची आई आमची मोठी आजी पुडाची पोळी करायची. तिची पोळी खूप साऱ्या पापुद्र्यांनी भरलेली असायची.
माझं तस नाही. मला चेंज हवा असतो असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे, मिस्सी रोटी, खस्ता रोटी ,लछा पराठा, तंदुरी रोटी, भाकरी, पुरी- पालक,कळण्याची, तिखटमिठाची, तिखट मीठ पराठा, असं रोज काहीतरी वेगळं हवं असायचं जर मी करत असेन तर पण जर मला मिळणार असेल आयती तर मात्र मला काही प्रॉब्लेम नव्हता. तेच तेच रोज करायचं म्हंटल कि मात्र मी रोज काहीतरी वेगवेगळं करण पसंत करते. आपण म्हणतो ना "कामात बदल म्हणजे विश्रांती", तस काहीस होत मला.
Page No.: 27
तर पुन्हा पोळी कडे येतांना मला निवेदिता आठवतेय. ती खूप सुबक सगळं करायची. तिची एक इच्छा पूर्ण होऊ नाही शकली. तिला नवोदित लग्न झालेल्या मुलींसाठी एक कोर्स डिझाईन करायचा होता.
म्हणजे अगदी चुकणारच नाहीत अशा खूप साऱ्या रेसिपीज तिने स्वतःच शोधल्या होत्या. तो कोर्स बनवायचा राहून गेला. अनपेक्षितपणे कॅन्सरने निवेदिता गेली, तिने केलेले गाकर, आणि मोगर म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण. तिने केलेले पोहे पण खूप छान असायचे. पोळी मउचं होणार, त्यात क्वालिटी कंट्रोल हा प्रकार असायचा त्या पदार्थाची चव अजिबात बदलायची नाही. अजून एक विशेष म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना काय आवडतं हे तिच्या जसच्या तस लक्षात असायचं. आणि ते जेव्हा तिच्याकडे यायचे तेव्हा ती ते पदार्थ त्यांच्यासाठी आठवणीने आणि आनंदाने करायची.
ही पोळी मला आठवते जेव्हा मी बाहेर फिरायला जाते. बाहेरच्या देशात गेल्यावर नवीन पदार्थ मी एन्जॉय करते पण काही दिवसांनी पोळी आठवायला लागते. आणि ग्लूटेन वैगेरे काही नाही आपल्या भौगोलिक परिस्थिती प्रमाणे तीच महत्त्वाची वाटते.
ह्या क्वारंटाईन च्या काळात संध्याकाळी माझी मुलं, राही आणि राज काहीतरी छान बनवत असतात. एकदा मुलीने फ्रँकी खाऊ घातली, quesadilla किंवा केसरीया खाल्ली, आणि मग टाकोज सगळं एकाच पिठाचं (मक्याच्या) बनवलेलं फक्त आकार वेगवेगळे , आणि नावे वेगवेगळी गम्मत म्हणून आम्ही तिला म्हणायचो कि आज काय नवीन? फक्त सामोसा राहिला आणि तिने तो सुद्धा खाऊ घातला. स्टफिंग बदललं कि पदार्थ बदलतो.
Page No. : 28
रोटीवरून आठवलं एकदा विजय डेन्मार्कला गेला होता, विजय आणि त्याचा मित्र सुहास दिवसे दोघांचे सरकारतर्फे खेळाडूंच्या टीमबरोबर जाण्यासाठी सिलेक्शन झाले होते. तिथे विशेष म्हणजे काही पाकिस्तानी खेळाडूंनी जेवायला बोलावलं होतं आणि छान गरमागरम जेवण बनवलं होतं त्यात आपल्या सारख्या मोठ्या मोठ्या लाटून केलेल्या पोळ्या होत्या. तो दिवस त्यांचा खूप छान गेला होता.
बाहेरच्या देशांतील रोट्या म्हणजे खरी गम्मत. माझं सिंगापूर ला एका कोर्स साठी सिलेक्शन झालं होत. आणि चक्क विजयला पण जमत होतं त्यामुळे आम्ही सगळेच गेलो होतो. राही, राजही आले होते. रोज ब्रेकफास्ट करतांना मी होमवर्क करत असे आणि हे सगळे आज काय पाहायचं, साईट सिईंग ला कुठे जायचं ह्याची चर्चा करीत असत. खूप मनाला त्रास व्हायचा पण छान पण वाटायचं कि चला नवरा आहे मुलांबरोबर, मुलांचं त्यामुळे अजिबात टेन्शन नाही. असा सपोर्ट विजय नेहमीच करत आलेला आहे. त्यामुळे होम वर्क अजून चांगला व्हायचा. आम्ही एका ठिकाणी संध्याकाळी जेवायला जात असू. तिथे बैदा रोटी मिळायची त्यात चिकन किंवा एग स्टफ केलेलं असायचं.
माझ्या सासरी रोज पोळ्या आणि भाकऱ्या दोन्हीही असतात. तिथला सगळ्यात सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी ; मांडे. हे मांडे करण्यासाठी कौशल्य आणि धाडस दोन्ही लागत. कारण ते एकतर खापरावर करतात. आणि पूर्ण भरून करतात. एक व्यक्ती एक मांडा खाऊ शकत नाही. हे लुसलुशीत मांडे आंब्याच्या रसाबरोबर किंवा तांदळाच्या खिरींबरोबर छान लागतात. तसच कटाच्या आमटी सोबत तर छान लागतातच.
आज एवढेच पुरे बाकीचे डॉट्स उद्या जोडूयात. पोळीवरून एवढं आठवेल असं वाटलं नव्हतं.
क्रमशः
आरती सूर्यवंशी
आरती सूर्यवंशी
Page No. : 29
Page No. : 30
No comments :
Post a Comment